हवेली सहकारी बँकेची स्थापना सन २००० मध्ये झाली . मोशी हे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने काहीसे दुर्लीक्षित होते. गावातील व्यावसायिक , तरुण उद्योजक यांना बँकिंग सुविधेसाठी , कर्ज व्यवहारासाठी पिंपरी चिंचवड मधील शहरी भागात हेलपाटे घालावे लागत होते. मोशी गावातील नागरिकांची बँकिंग बाबतची गरज श्री. कैलास बबन आल्हाट या सुशिक्षित तरुणाने ओळखली , ते स्वतः व त्यांचे तरुण सहकारी यांनी एकत्र येऊन आपणच सहकारी तत्वावर चालणारी बँक काढावी म्हणजे मोशीकरांची बँकेची म्हणजे अडचण दूर होईल हा विचार करून या तरुणांनी भाग भांडवल उभारणीच्या कामास सुरुवात केली, तो काळ होता १९९८-१९९९ चा.

औद्यागिक क्षेत्रात प्रचंड मंदीचे वातावरण होते. पिंपरी चिंचवड M.I.D.C.मधील असंख्य उद्योग बंद पडत होते. अशा प्रतिकूल परीस्थितीत या मंडळींनी युनिट बँकेसाठी एन्ट्री पॉईंट कॅपिटल त्यावेळी रु . ५० लक्ष होते ते जमवण्याचे आव्हान स्वीकारले. भगीरथ प्रयत्नातून ही रक्कम उभी केली व रिझर्व्ह बँकेकडे बँकेचा प्रस्ताव सादर केला. असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले व सरतेशेवटी रिझर्व्ह बँकेने हा प्रस्ताव स्वीकारला व बँक निर्मितीचे स्वप्न साकार झाले, तो दिवस होता २६ जानेवारी २०००.

आता बँकेस २२ वर्ष पूर्ण झाली , या २२ वर्षात बँकेचे भागभांडवल ४,३९,१०,२०० असून सभासद संख्या ६५०० आहे. मोशी गावातील नागरिक बँकेच्या सेवेचा सतत लाभ घेताना दिसत आहेत. गावाची आर्थिक स्थितीही आता खूप बदलली आहे . जमिनीचे भाव गगनाला भिडले. बिल्डर आता या भागाकडे वळू लागले, परिणामी येथील नागरिकांच्या हातात खेळते भांडवल आले. व्यवसायात वाढ झाली , बँकेच्या ठेवी व कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली व रु ९५ कोटी ठेवींचा टप्पा गाठला. युनिट बँकेचे रूपांतर लहान अर्बन बँकेत झाले , रिझर्व्ह बँकेने मेदनकरवाडी शाखेस परवानगी दिली. बँकेची मेदनकरवाडी शाखा देखील नफ्यात आली २०१४-१५ या आर्थिक वर्षात बँकेने स्वमालकिचे भव्य वास्तूत स्थलांतर केले.

बँकेस गेली २२ वर्ष ० टक्के NPA राखल्या बद्दल असोसिएशन ने सन्मानित केले आहे . तसेच बँक सभासदांना १५ टक्के लाभांश वितरित करते . हवेली बँकेचा हा कार्यपट प्रेरणादायी आहे. आता बँकेचे स्वरूप फक्त बँकिंग स्वरूपाचे राहिले नाही तर मोशीच्या नागरिकांचे मनात बँक एक आर्थिक मार्गदर्शक असे चित्र निर्माण झाले आहे . मोशी गावातील अनेक पतसंस्था हवेली सहकारी बँकेस आपला आदर्श मानतात . तरूणांच्या जिद्दी मधून हवेली सहकारी बँके सारखा आर्थिक प्रकल्प उभा राहू शकतो हे आश्चर्यकारक सत्य आहे. संपूर्ण संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी एक जुटीनें बँकेच्या हितासाठी पर्यटननं करत आहेत , बँकेचा भविष्यकाळ उज्वल आहे यात शंका नाही.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि पुणे यांच्याकडुन उत्कृष्ट कामगिरीसाठी हवेली सहकारी बॅंकेला मा. श्री अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री) व श्री बाळासाहेब पाटील(सहकार व पणन मंत्री) आणि श्री अनिल कवडे साहेब(सहकार आयुक्त) यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

  • Banko Award
  • Banko Award

Salient Features

"0" Percent Net NPA

Audit Grade "A"

Core Banking Solution

RTGS/NEFT Facility for Fund Transfer

ATM Facility

Any Branch Cheque Deposit Facility

Centralized Clearing

Over 6500 Members