हवेली सहकारी बँकेची स्थापना सन २००० मध्ये झाली . मोशी हे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने काहीसे दुर्लीक्षित होते. गावातील व्यावसायिक , तरुण उद्योजक यांना बँकिंग सुविधेसाठी , कर्ज व्यवहारासाठी पिंपरी चिंचवड मधील शहरी भागात हेलपाटे घालावे लागत होते. मोशी गावातील नागरिकांची बँकिंग बाबतची गरज श्री. कैलास बबन आल्हाट या सुशिक्षित तरुणाने ओळखली , ते स्वतः व त्यांचे तरुण सहकारी यांनी एकत्र येऊन आपणच सहकारी तत्वावर चालणारी बँक काढावी म्हणजे मोशीकरांची बँकेची म्हणजे अडचण दूर होईल हा विचार करून या तरुणांनी भाग भांडवल उभारणीच्या कामास सुरुवात केली, तो काळ होता १९९८-१९९९ चा.
औद्यागिक क्षेत्रात प्रचंड मंदीचे वातावरण होते. पिंपरी चिंचवड M.I.D.C.मधील असंख्य उद्योग बंद पडत होते. अशा प्रतिकूल परीस्थितीत या मंडळींनी युनिट बँकेसाठी एन्ट्री पॉईंट कॅपिटल त्यावेळी रु . ५० लक्ष होते ते जमवण्याचे आव्हान स्वीकारले. भगीरथ प्रयत्नातून ही रक्कम उभी केली व रिझर्व्ह बँकेकडे बँकेचा प्रस्ताव सादर केला. असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले व सरतेशेवटी रिझर्व्ह बँकेने हा प्रस्ताव स्वीकारला व बँक निर्मितीचे स्वप्न साकार झाले, तो दिवस होता २६ जानेवारी २०००.
आता बँकेस २२ वर्ष पूर्ण झाली , या २२ वर्षात बँकेचे भागभांडवल ४,३९,१०,२०० असून सभासद संख्या ६५०० आहे. मोशी गावातील नागरिक बँकेच्या सेवेचा सतत लाभ घेताना दिसत आहेत. गावाची आर्थिक स्थितीही आता खूप बदलली आहे . जमिनीचे भाव गगनाला भिडले. बिल्डर आता या भागाकडे वळू लागले, परिणामी येथील नागरिकांच्या हातात खेळते भांडवल आले. व्यवसायात वाढ झाली , बँकेच्या ठेवी व कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली व रु ९५ कोटी ठेवींचा टप्पा गाठला. युनिट बँकेचे रूपांतर लहान अर्बन बँकेत झाले , रिझर्व्ह बँकेने चाकण शाखेस परवानगी दिली. बँकेची चाकण शाखा देखील नफ्यात आली . २०१४-१५ या आर्थिक वर्षात बँकेने स्वमालकिचे भव्य वास्तूत स्थलांतर केले.
बँकेस गेली २२ वर्ष ० टक्के NPA राखल्या बद्दल असोसिएशन ने सन्मानित केले आहे . तसेच बँक सभासदांना १५ टक्के लाभांश वितरित करते . हवेली बँकेचा हा कार्यपट प्रेरणादायी आहे. आता बँकेचे स्वरूप फक्त बँकिंग स्वरूपाचे राहिले नाही तर मोशीच्या नागरिकांचे मनात बँक एक आर्थिक मार्गदर्शक असे चित्र निर्माण झाले आहे . मोशी गावातील अनेक पतसंस्था हवेली सहकारी बँकेस आपला आदर्श मानतात . तरूणांच्या जिद्दी मधून हवेली सहकारी बँके सारखा आर्थिक प्रकल्प उभा राहू शकतो हे आश्चर्यकारक सत्य आहे. संपूर्ण संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी एक जुटीनें बँकेच्या हितासाठी पर्यटननं करत आहेत , बँकेचा भविष्यकाळ उज्वल आहे यात शंका नाही.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि पुणे यांच्याकडुन उत्कृष्ट कामगिरीसाठी हवेली सहकारी बॅंकेला मा. श्री अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री) व श्री बाळासाहेब पाटील(सहकार व पणन मंत्री) आणि श्री अनिल कवडे साहेब(सहकार आयुक्त) यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
Mission
Accomplishing the objective of cooperation
To Achieve financial success and financial security
To provide easy, simple, cost-effective and innovative financial solutions to customers in a courteous and responsible manner.
Becoming a proper custodian for loans and savings
Maintaining net NPA at "0%" level.
मिशन
सहकाराचे उद्दिष्ट पूर्ण करणे
ग्राहकांना आर्थिक यश आणि आर्थिक सुरक्षितता मिळविण्यात मदत करणे
ग्राहकांना सुलभ, सोपे, किफायतशीर आणि नाविन्यपूर्ण आर्थिक उपाय विनम्र आणि जबाबदारीने प्रदान करणे.
कर्ज आणि बचतीसाठी योग्य संरक्षक बनणे
निव्वळ एनपीए "0%" पातळीवर कायम ठेणे.
Vision
To make a progressive co-operative bank through excellent performance and good governance .To adopt all modern technologies for better and faster service and to be the first co-operative bank in customer satisfaction. Our main goal is to uplift the common man through financial resources.
ध्येय/ उद्धिष्ट
उत्कृष्ट कामगिरी आणि चांगले प्रशासनाद्वारे प्रगतीशील सहकारी बँक बनवणे व अधिक चांगल्या आणि जलद सेवेसाठी सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि ग्राहकांच्या समाधानात प्रथम सहकारी बँक बनवणे . सामन्यातील सामान्य माणसाचा वित्तीय दृष्टिकोनातून उत्कर्ष साधणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
Awards
Salient Features
Mobile Banking, OR code, UPI ,IMPS
"0" Percent Net NPA
Audit Grade "A"
Core Banking Solution
RTGS/NEFT Facility for Fund Transfer
ATM Facility
Any Branch Cheque Deposit Facility
Centralized Clearing
Over 6500 Members